जळगाव येथील आशादीप महिला वसतिगृहात काही पोलिस कर्मचारी व ईतर पुरुषांनी महिलांचा कपडे काढून नाचायला लावण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली. यावर विरोधात असणार्या भाजपनेसुद्धा सभागृहात प्रश्न ऊपस्थित केले. जळगाव जिल्हाधिकार्यांनी समिती नेमुन तपासास वेग दिला आहे. मात्र गणेश कॉलनीतील या वसतिगृहाबाबत अजबच माहिती समोर आली.
विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी वसतिगृहाच्या परिसरातील शेजार्यांच्या या घटनेबाबत प्रतिक्रया घेण्याचा प्रयत्न केला. यावर शेजार्यांनी गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या वसतिगृहाबाहेर अवेळी कधीही मुलं यायची आणि वसतिगृहातील महिलांकडे बघून ईशारे करायचे. दोन वर्षांपासून या संस्थेत वाईट प्रकार घडतात आहेत. शिस्त नावाची कुठलिच गोष्ट या वसतिगृहात नाही. तसेच बाहेरुन आलेल्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नसला, तरिसुद्धा मुले बाहेरुन मुलींशी बोलातात आणि विशेष म्हणजे हा प्रकार संस्थेच्या कर्मचार्यांच्या डोळ्यांसमोर घडत असल्याचेसुद्धा सांगीतले.
या परिसरातील काही महिलांनी हे वसतिगृह येथुन हलवण्याची मागणीसुद्धा केली आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच मुली पत्रकारांशी बोलण्याकरिता खिडकीजवळ आली असता महिला कर्माचार्याने तिला आतमध्ये अोढत नेले. “आम्हाला बोलू दिलं जात नाहीये, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय” अशी ती मुलगी खिडकीतून अोरडत सांगत असल्याचे लोकमतने सांगीतले आहे.
याप्रकरणी महिला व बालविकास विभागास आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या समितीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. यामध्ये तक्रारदार महिलांचे जवाब नोंदवण्यात आले आहेत.