आजपासून बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच व्यवहार सुरु असतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. बारामती शहर व तालुक्याला हा नियम लागू असेल.
बारामती शहर व तालुक्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असेल, असेही दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
दहावी बारावीच्या नियोजित परिक्षा वगळता सर्व शाळा व महाविद्यालयांचे कामकाज येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद असेल. शासकीय नियमावलीचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई पोलिस करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या पुरवठादारांसह हॉटेल पार्सल सेवेच्या व्यक्तींनाही यातून सूट देण्यात आली आहे.
मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमींगपूल, स्पा, जिम हे पुढील सात दिवस बंद असतील. सर्व आठवडे बाजारही या काळात बंद असतील.