बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नगर पालिकेतील चार नगरसेवकांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा झटका मानला जात आहे. चार नगरसेवकाच्या प्रवेशाने शिवसेनेची बीड नगरपालिकेत ताकत वाढली आहे.
प्रभाकर पोपळे, गणेश तांदळे, रणजित बनसोडे, भैय्यासाहेब मोरे या चार नगरसेवकांनी आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
या आधीही काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आम्ही काकू नाना आघाडीतून निवडून आलो. पण आम्ही आमच्या भागाचा विकास या चार वर्षांत करू शकलो नाही. राहिलेल्या एक वर्षात तरी वार्डाचा विकास करता यावे, या उद्देशाने आज आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत.
आम्ही विरोधी बाकावर असूनही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आमच्या भागातील विकासासाठी मोठे प्रयत्न केले आहेत, अशी भावना शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या.