गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेते जोरदार ईनकमींग सुरु आहे. विशेष म्हणजे शिवसेनेर प्रवेश करणारे अधिकांश नेते हे भाजपचे आहे. त्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ होणार असल्याचे चित्र आहे. भाजपाचे नेतृत्व सध्या बिनधास्त आहे. मात्र मागील काही दिवसांतील भाजपला रामराम ठोकुन शिवसेनेत येणार्यांकडे बघितले असता, लवकरच भाजपला याकडे गांभीर्याने बघावे लागेल असे बोलले जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. अशांतच काही कारणांवरुन पक्ष सोडलेल्या नेत्यांची स्वगृही वापसी करण्याकरिता सेना प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसते आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक अनिल कदम आणि माजी नगरसेविका प्रेसिला कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्या ऊपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून घेतले आहे. यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.
काही दिवसांअगोदर भाजपाचे दोन मोठ्या नेत्यांना शिवसेनेत सामील करत सेनेतर्फे भाजपाला मोठा धक्का देण्यात आला होता. शिवसेनेची ही धक्के देण्याची मालिका कायम असल्याचे बोलले जात आहे. माजी आ. कृष्णा हेगडे आणि माजी आ. हेमेंद्र मेहता तसेच नगरसेवक समीर देसाई यांनी सेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता अनिल कदम आणि प्रेसिला कदम यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. कृष्णा हेगडे आणि हेमेंद्र मेहता यांचे त्यांच्या मतदारसंघात वर्चस्व आहे. तसेच वडाळा, नायगाव या भागात भाजपचे आ. कळंबेकर यांची पकड आहे. मात्र या गडालाच शिवसेने खिंडार पाडले आहे. त्यामुळे शिवसेनेला याचा निश्चितच फायदा होणार आहे. भाजपाच्या नेत्यांची ही आउटगोईंग अशीच सुरु राहिल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र भाजपाला याचे परिणाम भोगावे लागणार असल्याची परिस्थिती आहे.
नुकताच अमित शहा यांचा महारष्ट्र दौरा संपन्न झाला. नारायण राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर चांगलेच टीकास्त्र सोडले. मात्र अमित शहा परतल्यानंतर लगेचच तेथील ७ भाजप नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. अमित शहांच्या टीकेला हे ऊत्तम प्रत्युत्तर ठरले असल्याचे शिवसेनच्यावतीने सांगण्यात येत अाहे.