महाराष्ट्रात पुन्हा कोरोना वाढतो आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्यमुळे प्रशासन आणि राज्याचा आरोग्य विभाग एक्शनमध्ये आला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरीता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दिवसरात्र काम करत असल्याचे आपण बघितले. नियमांचे पालन करण्यासंबंद्धी त्यांनी वारंवार जनतेस आवाहन केले आहे. मात्र आता राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांकडे मदतीची मागणी केली आहे. राजेश टोपे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचे नावे एक पत्र लिहीले आहे.
या पत्रामध्ये सर्वप्रथम त्यांनी खंत व्यक्त केली आहे. नुकत्याच शाळा, माहविद्यालये सुरु झाले होते. मात्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे पुन्हा निर्बंध आणावे लागले. हे तुमचे खेळण्याचे, बागडण्याचे वय आहे. मात्र वर्षभर तुम्हाला कोरोनामुळे घरातच राहावे लागले. याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या सहाय्याने आपण कोरोनाशी लढतो आहोत. आपण ही लढाई जिंकणारसुद्धा यात शंकाच नाही. मात्र या लढाईला अधिक बळकटी देण्यासाठी विद्यार्थीमित्रांनो मला तुमची मदत हवी आहे. प्रथम तुम्ही स्वत: स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. त्यानंतर आपले आई-वडिल, भाऊ-बहिन आणि शेजार्यांचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आपले आई-वडिल कामानिमित्त बाहेर जातात. व्यस्थ कारभारात अनेकदा काही गोष्टी विसरायला होतं. मात्र मास्क घेतले की नाही, सॅनीटायझरचा ऊपयोग, बाहेरुन घरात अाल्यावर हात धुणे या गोष्टींची आठवण तुम्हाला त्यांना करुन द्यायची आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्यास लगेच त्यांना सरकारी दवाखान्यात घेऊन जायचे आहे. असे टोपे आपल्या पत्रात म्हणाले आहे.
शेवटी राजेश टोपे यांनी तरुण विद्यार्थीमित्रांचे कौतुक करत, आपण ही लढाई जिंकणारच असा विश्वास दिला आहे. तसेच तुम्ही मला नदत करणार अशी खात्रीसुद्धा पत्रात व्यक्त केली आहे.