पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षांकडे पाठ फिरवल्याचे आले समोर

10

विद्यापीठांमधील ऑनलाईन परीक्षेचा सावळा गोंधळ मागील वर्षी संपूर्ण राज्याने पाहिला. त्या पार्श्वभूमीवर यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मुख्य परीक्षेपूर्वी सराव परीक्षा घेण्यात येत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षांना 5 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सराव परीक्षांकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे .

10 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये पुणे, अहमदनगर आणि नाशिकया तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.5 ते 9 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात ही सराव परीक्षा होत आहे.

सोमवारी 1 लाख 10 हजार 17 विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 68 हजार 470 जणांनीच परीक्षा दिल्याचे समोर आले. तर 41 हजार 547 विद्यार्थ्यांनी या परीक्षांकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे.