‘मग तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’ सुभाष देसाईंचा भाजपला सवाल

65

औरंगाबादच्या नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला सातत्याने टिकास्त्रव करणाऱ्या भाजपला शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप शिवसेनेला नामांतराच्या मुद्द्यावरुन सतत टोमणे मारते. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन आम्हाला राजकारण करायचे नाही. पाच वर्षांच्या कालावधीत औरंगाबादचे नामांतर होणार का, माहिती नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असे सुभाष देसाई यांनी म्हटले.

ते ‘टीव्ही 9 मराठीशी’ बोलत असताना चंद्रकांतदादा पाटील यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी इतकीच बांधिलकी होती तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का, असा सवाल सुभाष देसाई यांनी भाजपला विचारला आहे.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ता कुणाकडे होती, सर्व सत्ताधीश कोण होते? मात्र, त्यावेळी औरंगाबादचे नामांतर त्यांच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नव्हता. आता त्या मुद्द्यावरुन राजकारण करुन फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जात आहेअसेही सुभाष देसाई यांनी म्हटले. आमचं कर्तव्य म्हणून आम्ही औरंगाबादच्या नामांतरासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ते करणारच, असेही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.