विखेपाटलांच्या मध्यस्थीला आले यश

29

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काल उशिरा ग्रामस्थ व बगाटे यांच्यात झालेल्या चर्चेत, मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे येत्या शनिवारी देण्यात आलेला “शिर्डी बंद’चा इशारा तूर्त स्थगित करण्यात आला, अशी माहिती माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिली.

साईमंदिर परिसराचे तीन व चार क्रमांकाचे दरवाजे खुले होतील. भाविकांसोबतचे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल थांबतील. लिखापढी करून मंदिर परिसरात प्रवेश करण्याची जाचक अट मागे घेतली जाईल. पूर्वेकडील ओस पडलेल्या बाजारपेठेला काही प्रमाणात यामुळे जीवदान मिळेल.

पारनेरमधील 75 टक्के, राहुरीतील 55 टक्के व नगर तालुक्‍यातील 65 टक्के शेतकऱ्यांनी न्यायालयात हा विषय नेण्याच्या माझ्या भूमिकेला सहमती दाखविली आहे. के. के. रेंज भूसंपादनावरून मध्यंतरी गरजेपेक्षा जास्त राजकारण झाले. खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, “”पारनेर, राहुरी व नगर या तीन तालुक्‍यांतील गावांचा हा प्रश्न आहे.

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत सर्व मागण्या मान्य झाल्याने, शनिवारचा “बंद’ तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बगाटे यांनी आज दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती केली, तर ग्रामस्थांना सुलभपणे साईदर्शन घेता येईल.

कोते म्हणाले, की या बैठकीस नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, डॉ. एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, प्रमोद गोंदकर, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.