कालच्या भारत, इंग्लंड सामन्यावर असाही सट्टा; डोंगरावरून प्रत्येक चेंडूवर सट्टेबाजांच लक्ष

54

काल झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या 33 बुकींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. गहुंजे क्रिकेट मैदानाच्या जवळील गोदरेज प्रॉपर्टी, घोरडेश्र्वर डोंगर, आणि पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधून बुकींना पोलिसांनी अटक केली.

सदरील बुकींकडून मोबाइल, लॅपटॉप, कॅमरे, दुर्बिणी,
विदेशी नोटा असा 45 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे घोरडेश्वराच्या टेकडीवर जाऊन दुर्बिणीतून प्रत्येक चेंडूवर नजर ठेऊन प्रत्येक मिनिटाला हे बुकी सट्टा लावत होते. सदरील सर्व बुकी महाराष्ट्रातील तसंच परराज्यातील आहेत.

दुर्बिणीच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवून मग बुकी बुकिंग घेत होते. टिव्हीवर तोच चेंडू दिसायला साधारण ४ ते ५ सेकंदाचा अतिरिक्त कालावधी लागतो. याचाच फायदा घेऊन हे बुकी अनेकांना फसवून आपला धंदा करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे सदरील सट्टेबाजांनी चांगलंच डोकं लावल्याची चर्चा आहे.