‘असा मोहरा कधी न जाहला पुढे न होणार’; संजय राऊतांकडून बाळासाहेबांना दंडवत

5

बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा स्मृतीदिन. आज विविध राजकीय पक्षाचे नेते बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांची आठवण काढताना  ‘असा मोहरा कधी न जाहला’, असं म्हणत आपल्या नेत्याला साष्टांग दंडवत घातले आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. मात्र, बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असताना संजय राऊत कमालीचे भाऊक पाहायला मिळाले.

‘असा मोहरा कधी न जाहला पुढे न होणार… बाळासाहेब ठाकरे नाव जगात गर्जत राहणार’, अशा भाऊक शब्दात संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. त्यांच्यासारखा नेता होणं शक्य नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. साहेब आम्हाला पोरके करून गेले असे भाऊक उद्गार संजय राऊत यांनी काढले आहेत. फेसबुकवर त्यांनी भाऊक पोस्ट शेअर करत बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.