महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. आता पुन्हा या सिमावादावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केली आहे.
त्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, असे वक्तव्य केले. मुंबईवर आमचा हक्क आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं सवदी यांनी म्हटलं आहे. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात तणाव, आणि संतापजनक वातावरण निर्माण झालं आहे.
यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवद यांना चांगलेच धारेवर धरले आहे. असे येडे बरळतच असतात, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सागंतिलं तेच योग्य आहे. हा केवळ कर्नाटकचा प्रश्न नाही. तर दोन राज्यांच्या प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. असे खडे बोल राऊत यांनी सुनावले.
कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही. आम्ही फक्त कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.