राष्ट्रवादी पक्षाकडून नेते, कार्यकर्त्यांना ‘या’साठी देण्यात आल्या सूचना…

39

कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटातून बाहेर येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन आदरणीय खा. शरद पवार यांनी केले आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्याला राज्यातून किती प्रतिसाद मिळतो ते पाहणं औत्सक्याचं ठरेल. मात्र, त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जिल्हा, तालुका पातळीवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे पत्र राज्यातील सर्व नेत्यांना पाठवण्यात आले आहेत.

तसेच सदरील शिबिरांच्या कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पाठवण्याची सूचना प्रदेशाध्यक्षांनी पत्राद्वारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केली आहे.