सूट,सूट,सूट:टाटा मोटर्सच्या गाड्यांवर विशेष सवलत

15

टाटा मोटर्सने २०२० मध्ये ग्राहकांसाठी सूट आणि गाड्यांवर विशेष सवलत दिली आहे. ही ऑफर १ डिसेंबर पासून सुरू झाली असून गाड्यांवर ६५ हजारांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये टाटा हॅरियर, नेक्ससॉन SUV, टियागो हॅचबॅक, टिगोर सेडान इत्यादी गाड्यांचा समावेश आहे.

तसेच कंजुमर स्कीम एक्सचेंज आणि कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे. टिगोरवर ३० हजारांची, टाटा हॅरियरवर २५ हजार ग्राहक सूट, तर ४० हजारांपर्यंत बोनस सूट, तसेच नेक्ससॉनवर १५ हजारांची सवलत मिळणार आहे.

नेक्ससॉनच्या पेट्रोल मॉडेलवर कोणतीही सवलत देण्यात आली नाही.