नागपूर, दि. –
सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत असणारे विदर्भाचे सुपुत्र सुजित वंजारी यांना त्यांनी केलेल्या विशिष्ट कार्याबद्दल भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनी वीरता पदक घोषित करून सन्मानित करण्यात आले आहे. सद्या ते रांची येथे कार्यरत आहेत.
सन २०१९ ते २०२२ या काळात काश्मिरमधील पुलवामा येथे CTT कमांडर म्हणून कार्यरत असताना त्यांनी कलम ३७० हटवण्यापासून अनेक खडतर अँटी मिलिटंट ऑपेरेशनमध्ये नेतृत्व केले आहे. मार्च २०२२ मध्ये पुलवामा येथील चिवा कलानमध्ये झाल्येल्या संयुक्त चकमकीत जैश इ मोहम्मद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या विशेष पुरस्काबद्दल राष्ट्रपतींनी अभिनंदन केले आहे.
मूळचे विदर्भातील भंडाऱ्याचे असलेल्या सुजित वंजारी यांची तिसरी पिढी पोलिस सेवेत आहे. व्हीजेटीआय कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २०११ मध्ये त्यांची सीआरपीएफमध्ये निवड झाली. त्यांचे वडील स्व.भास्करराव वंजारी भंडारा येथे सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी कार्यरत होते. त्यांनाही पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचेकडून विशिष्ट कार्य सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते. त्यांचे आजोबा रामकृष्ण वंजारी हेदेखील पोलिस सेवेत होते. आपल्या पदकाचे श्रेय त्यांनी आई, वडील आणि पत्नी यांना दिले आहे.