सव्वावर्षांचा कालावधी संपल्याने भाजपच्या सरस्वती शेंडगे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आघाडी म्हणून हे पद ‘आरपीआय’कडे देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यानुसार या पदासाठी ऑनलाइन निवडणूक झाली.
शहराच्या उपमहापौरपदावर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आघाडीच्या सुनीता वाडेकर यांची मंगळवारी निवड झाली.
उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने शेंडगे यांना संधी दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा उपमहापौरपद आरपीआयकडे आले आहे.