रिपब्लिकन पक्षाला मिळणार पुण्याचे उपमहापौर पद ! पक्षाच्या सुनिता वाडेकर यांच्याकडे सोपवली जाणार पदाची धुरा !

13

रिपब्लिकन पक्षाच्या पण भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या महापालिका आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर यांची उपमहपौरपदी निवड होणार आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे.

सभागृहनेते धीरज घाटे यांचा राजीनाम्यानंतर गणेश बिडकर यांची नियुक्ती झाली. त्याचवेळी राजकीय वर्तुळात नव्या व्यक्तीची उपमहापौरपदी निवड होणार असल्याची चर्चा सुरू होती.

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पदाचा राजीनामा आज दिला आहे .त्यामुळे आता उपमहापौरपद पुन्हा एकदा आरपीआयला मिळणार आहे.

महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेत पदाधिकार्‍यांचे बदलास सुरवात करण्यात आली होती. भाजपनने उपमहापौर पद आरपीआयला देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.२०१७ मध्ये पुणे महापालिकेत भाजपला आरपीआयच्या मतांचा फायदा झाला आणि पदरात मोठे यश मिळाले होते.