सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय

17

मराठा आरक्षणासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. तसेच मराठा आरक्षणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येऊ नये, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी सर्व पक्षकारांच्यावतीनं करण्यात आली होती. मात्र, आज देखील ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. सुनावणीला सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुरुवात होणार आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर मराठा समाजात चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल होताना पुरेपूर काळजी न घेतल्याचा आरोप विरोधकांकडून तसेच मराठा समाजातील नेत्यांकडून केला जात आहे.