बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काही दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बॉलीवूडसह सगळ्यांच या गोष्टीचा धक्का बसला होता. यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाली असून राजकुमार चा सहकारी अली हसन याची प्रकृती चिंताजनक आहे. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत.
यामाहा शोरूमचे मालक राजकुमार सिंह यांचे सहरसा, सुपौल आणि मधेपुरा अशा तीन जिल्ह्यात यामाहा मोटारबाईकचे शोरूम आहे. शनिवारी दि 30 जानेवारी 2021 रोजी मधेपुरा येथे जाताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. या घटनेत राजकुमार यांच्यासह त्यांचा सहयोगी गंभीर जखमी झाले आहेत.
आरोपींनी कोणत्या कारणामुळे हा हल्ला केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिहारमध्ये गेल्या काही दिवसात अनेक गुन्ह्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. विरोधी पक्ष यावरून सरकारवर हल्ला चढवत आहे. त्यांचा असा आरोप आहे की, नितीश कुमार यांच्या शासनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे.