मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवली जाऊ शकत नाही:सर्वोच्च न्यायालय

11

एसईबीसी’ प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. आरक्षणावर दिली गेलेली स्थगिती उठवण्यासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होत आहे.मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास तुर्तास नकार दिला आहे. सुप्रिम कोर्टाकडून मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती हटवली जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे अनेक दिवसांपासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया व नोकर भरती प्रक्रिया रखडली होती.आता सर्वांचे लक्ष असलेल्या अर्जावर सुनावणी होत आहे. या सुनावणीत ॲड. संदीप देशमुख आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी हे बाजू मांडत आहेत. समाजाला न्याय मिळेल, असे मत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केले आहे. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्यातर्फे आज न्यायालयात मांडली जात आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेऊन त्यांना ही भूमिका सांगितली होती.पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. आरक्षणावर अंतिम निकाल येणं बाकी आहे. या प्रकरणाची नियमित सुनावणी येत्या जानेवारीच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात सुरु होईल.