बुलढाण्यात ‘स्वाभिमानी’चा रेल रोको

10

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर रेल रोको आंदोलन केले. हे आंदोलन कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटनेने पुकारले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी बिलाविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला आहे. या कृषी बिलाविरोधात देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत.त्या निमित्ताने आज भारत बंद ठेवण्यात आला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून काही पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला असल्याचा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेसमोर ‘रेल रोको’करत आंदोलन करण्यास सुरू केले आहे. नंतर पोलिसांनी त्यांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला सारत ताब्यात घेतले आहे.