चेन्नई एअर कस्टम विभागाने विमानतळावर विमान प्रवाशांकडून 2.17 कोटी मूल्याचे 4.15 किलो सोने जप्त करण्यात आले. हे सोने त्यांनी गिळले होते. याप्रकरणी पोलिसांनी 7 प्रवाशांना अटक केली आहे. सात प्रवाशांनी पॉलिथिनने गुंडाळलेल्या गोल्ड कॅप्सुल्स गिळल्या होत्या. चेन्नई कस्टम विभागाने सोमवारी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे गुप्तचर अधिकाऱ्यांनी 22 जानेवारीला दुबई आणि शारजाह येथील चार महिलांसह आठ प्रवाशांना संशयावरून अटक केली आणि तपासादरम्यान प्रवाशांनी गुन्हा कबूल केला. एका प्रसिद्धीपत्रकात चौधरी म्हणाले की, सोन्याच्या पुनर्प्राप्तीची प्रक्रिया अवघड होती कारण प्रवाशांना भरपूर खाद्य दिले गेले जेणेकरून शौच करण्याच्या वेळी सोने बाहेर येईल. प्रवाशांनी सोन्याचे कॅप्सूल गिळंकृत केले असून या संदर्भात आठ प्रवाशांपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेस आठ दिवस लागले. आठपैकी एका प्रवाशाला अटक करण्यात आलेली नाही. कारण त्यांच्याकडून जप्त केलेले सोन्याचे मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि नियमानुसार, तस्करीची किंमत यापेक्षा जास्त असेल तरच त्यांना ताब्यात घेतले जाते. ते म्हणाले की, एकूण 4.15 किलो सोन्याचे साठे सापडले असून त्याची किंमत 2.17 कोटी रुपये आहे. अधिक तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
2.88 किलोच्या एकूण 161 कॅप्सुल्स 8 प्रवाशांच्या पोटातून काढण्यात आले आहे. याची किंमत 1.28 कोटी रुपये आहे. शिवाय 3 सोन्याच्या साखळ्या, 8 सोन्याच्या रिंग, 61 कॅप्सुल्स बँग आणि पँट पॉकेटमधून जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 82 लाख रुपये असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे