निर्णय घ्या अन्यथा ४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर ऊतरु ‘या’ शेतकरी नेत्याचा सरकारला ईशारा

11

प्रजासत्ताकदिनानिमित्त काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर आता ६ फेबृवारील देशव्यापी चक्का जाम करणार असल्याची हाक शेतकर्‍यांकडून दिली आहे. दरम्यान आंदोलनावर ताबा मिळवण्यासाठी सरकारकडून बलाचादेखील उपयोग होतो आहे. परंतू कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही ईथून हटणार नाही या भूमिकेवर शेतकरी कायम आहे. यातच अॉक्टोंबरपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा संपूर्ण देशभरातून ४० लाख ट्रॅक्टर रस्त्यावर ऊतरवून आम्ही आंदोलन करु असा निर्वाणीचा ईशारा किसान युनीयनचे नेते राकेश टीकैत यांनी सरकारला दिला आहे. झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी गाझीपूर बॉर्धसवर टीकैत यांची भेट घेतली. या भेटीनंतर राकेश टीकैत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एएनआयने हे वृत्त दिले अाहे.

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला. यादरम्यानच राकेश टीकैत यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. या घटनेचा परिणाम होऊन हे आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. यातच देशभरातील विरोधी पक्षातील नेते टीकैत यांची भेट घेण्यासाठी दिल्ली सिमेवर येत आहेत. नुकतीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टीकैत य‍ांची भेट घेतली होती. आता झारखंडचे कृषीमंत्री यांनी टीकैत यांची भेट घेऊन आंदोलनाला समर्थन दिले आहे. यावेळीच टीकैत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

“सरकारला आम्ही अॉक्टोंबरपर्यंतचा वेळ देतो आहोत तोपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण देशभरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात येईल, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही परतणार नाही” असे टीकैत यावेळी म्हणाले. सोबतच संपूर्ण देशात नव्या कृषी कायद्यांविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेऊन येणार असून भारतीय किसान युनीयन त्यावर काम करेल असेसुद्धा त्यांनी म्हटले.