पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, ताप आणि खोकला असल्याने त्या मुंबईला परतल्या. कोरोनाची खबरदारी स्वीकारत त्या होम आयसोलेट झाल्या आहेत. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्या बाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात,स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी भगिनी पंकजाताई मुंडे यांना तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. या वेळी त्यांनी पंकजताई मुंडे यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. या निमित्ताने पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा एकदा संवाद झाला. काही दिवसांपूर्वी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी हे दोघे भेटले होते. पंकजा यांनी ट्विट करून आपण मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला हजर राहणार नसल्याचे सांगितल्या नंतर राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना पंख फुटू लागले होते.
परंतु तब्बेत खराब असल्यानेच भाजप नेत्या पंकजा मुंडे मतदानाला गैरसमज आहेत, कोणीही याचा वेगळा अर्थ काढू नये, असे आव्हान भाजपच्या खासदार प्रतिमा मुंडे यांना करावे लागले होते. मला या आजारात जो त्रास झाला तो तुझ्या वाट्याला येऊ नये, असे म्हणत पंकजा मुंडे यांच्या तब्बेतीत लवकर सुधारणा व्हावी. अशा सदिच्छाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.