धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, आता त्यांना सदरील प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं.
रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे अरोपामुळे त्रस्त झाले होते. मात्र आता रेणू शर्मा या तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
‘गंभीर आरोप धनंजय मुंडेवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसानीं करावी यामुळे ज्या खऱ्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो म्हणून खोटे आरोप करणार्यांना शिक्षा व्हायलाचं हवी’ असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.