कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील रुग्णालयं, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधांचा साठा या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. नागरिकांना बेड्सची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन व्यवस्था निर्माण केली आहे.
काल मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. शासनाने जाहीर केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. काही पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळले आहेत. हे पुन्हा निर्देशनास आल्यास कडक कारवाई केली जाईल.
लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या राज्यात अधिक लस पुरवावी ही राज्य सरकारची मागणी आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त टेस्टींग होत आहेत.
काही राज्यात टेस्टींग नसल्याने रुग्ण दगावत आहेत मात्र आपल्या राज्यात आम्ही हे होऊ देणार नाही. केंद्र सरकारकडून ज्याप्रमाणात लसी येतील त्या तात्काळ नागरिकांना दिल्या जातील. असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.