‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेच्या लेखकांपैकी एक अभिषेक मकवाना याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक अनेक वर्षांपासून या मालिकेसाठी लेखक म्हणून काम करत होते. आत्महत्येपूर्वी अभिषेकने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. अभिषेक अनेक वर्षांपासून या मालिकेसाठी लेखक म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाइड नोट लिहिली असून त्यात आर्थिक समस्यांचा उल्लेख आहे. 27 नोव्हेंबरला अभिषेकचा मृतदेह त्याच्या कांदीवलीस्थित फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. अभिषेकने मृत्यूपूर्वी लिहिलेली सूसाईड नोट गुजराती भाषेत आहे. यात त्याने आर्थिक समस्यांचा उल्लेख केला आहे. मी परिस्थितीशी लढण्याचे बरेच प्रयत्न केलेत. पण अपयशी ठरलो. आता मी हरलो आहे, असे लिहित त्याने कुटुंबाची माफी मागितली देखील आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अभिषेक यांचा भाऊ जेनिस आणि कुटुंबीयांना अनोळखी क्रमांकावरून फोन येऊ लागले. त्यात अभिषेक यांनी त्यांच्या कंपनीकडून कर्ज रक्कम घेतली असून ती फेडण्यासाठी जामीनदार म्हणून त्यांचं नाव नोंदवलं आहे. त्यामुळे आता ती रक्कम तुम्हाला चुकवावी लागेल अशा प्रकारे धमकीचे फोन आले आहेत. पोलिसांनीही अभिषेकच्या सुसाइड नोटमध्ये आर्थिक फसवणूकीचा उल्लेख आल्याचं म्हटलं आहे. अनेक दिवसांपासून तो त्रास सहन करत होता. सुसाइड नोटमध्ये याबाबत अधिक काहीही सापडलं नाही.