जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा- नितीन गडकरी

1

आपला परिवार हा आपला समाज, आपलं नागपूर आहे, हे मी सांगितलं आणि कोरोनाच्या काळात मदत केली. सुरुवातीच्या काळात पीपीई किट आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नव्हत्या आम्ही पर्याय काढला एका कंपनीला किट बनवायला लावल्या आणि त्यांच्या पर्यंत पोहचविले. त्यात जाती पाहून देण्यात आल्या नाही. जातीच राजकारण नाही तर विकासच आणि मानवतेचा राजकारण केलं पाहिजे.

मात्र, आता ज्याप्रमाणे विरोधी पक्ष जातीच राजकारण करत आहे, त्यांना धडा शिकवायला पाहिजे. ज्यांनी मत दिली त्यांच्यासाठी तर काम कराच पण ज्यांनी नाही दिल त्यांच्या साठी सुद्धा चांगलं काम करा, केंद्रीय मंत्री गडकरींचा सल्ला.

ते नागपूर पदवी धर निवडणुक भाजपा उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते.