बिहारमध्ये ‘तेजस्वी’ यादव तळपले; सुरुवातीच्या कलानुसार आघाडी

4

आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. २४३ जागांसाठी तीन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणूक पार पडली. आज मतमोजणी होत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव असा सरळ सरळ मुकाबला आहे. बिहारचे मुख्यमंत्री कोण ? याचं उत्तर आज मिळणार आहे.

सुरुवातीचे कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कला नुसार महगठबंधन आणि तेजस्वी यादव यांना बहुमतापेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र अजून पूर्ण निकाल लागलेला नाही. सुरुवातीच्या एक तासाची मतमोजणी झाली आहे. दुपारी १ वाजता पूर्ण चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी तेजस्वी यादव यांची जादू बिहारी जनतेवर चालली असल्याचं दिसतंय.

तेजस्वी यादव यांनी विकासाच्या मुद्द्यावर लढविलेली निवडणूक त्यांना फायदेशीर ठरल्याचं बोललं जात आहे. नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेल्या मतदारांचा फायदाही तेजस्वी यादव यांना झाल्याचं चित्र आहे. लवकर निकाल हातात येतील.