दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली

5

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उघडण्यात आली आहेत. अवघ्या राज्यात मंदिरांची दारे उघडली व भक्तांनी जाऊन दर्शन घेतले आहेत. काही मंदिरांमध्ये पूजा झाल्यावर महाप्रसादाचे देखील आयोजन केले होते. राज्य सरकारच्या या नियमामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि हाजीआली दर्गा देखील काल उघडण्यात आले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी काल दिसून आली. दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, उस्मानाबादचे तुळजाभवानी मंदिर उघडण्यात आले असून मंदिरा बाहेर भल्या पहाटे भक्तांची गर्दी लागली होती. सिद्धिविनायक मंदिरात रोज एक हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी आहे. मंदिर उघडण्यासाठी दिवलीपाडवा मुहूर्त असल्याने भावकांची गर्दी पाहता कडक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, सर्व नियमांचे पालन करत मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटाईझरचा वापर करणे बंधनकारक आहे. दोन रांगांमध्ये सहा फूट अंतर ठेवून उभा राहावे. दहा वर्षाखालील आणि 65 वर्षावरील लोकांना मंदिरात येण्यास सक्त मनाई आहे. मंदिर सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेत उघडे असणार. मंदिरचा परिसर सकाळी व दुपारी सॅनिटाईझ करावा लागणार. आजारी किंवा क्वारंटाईन लोकांना मंदिरात येण्यास परवानगी नाही.