भारतीय जनता पक्षाचे १३ आणि एक अपक्ष असे १४ संख्याबळ आहे. यापैकी आज दहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी व्हायरल होत आहे. भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचेही माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी मुक्ताईनगर येथे फार्म हाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
इतकेच नव्हे, तर हे नगरसेवक नगराध्यक्षांकडे वारंवार पैशांची मागणी करायचे. त्यासोबतच एका नगरसेविकेच्या पतीने सणासाठी आपल्याकडून दोन लाख रुपये घेतले असल्याची माहितीही खडसे यांनी दिली.
मुक्ताईनगर नगरपंचायतीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचेही माजी मंत्री खडसे यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर मी राष्ट्रवादीतच असल्याचेही सांगण्यास ते विसरले नाहीत.