‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी’, अंकुश चौधरीने अनोख्या पद्धतीने केले नागरिकांना मास्क वापरण्याचे आव्हान !

19


मुंबई : सध्या संपूर्ण देशभरत कोरोना संसर्गाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. मात्र अद्यापही काही जण कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता विना मास्क वावरताना दिसत आहे. या विनामास्क वावरणाऱ्या मुंबईकरांना अभिनेता अंकुश चौधरीने अनोख्या पद्धतीने मास्क घालण्याचे आव्हान केले आहे.


अभिनेता अंकुश चौधरी याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यात लिहिलंय की ‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी..मी जबाबदार’. अंकुशच्या या पोस्टवर कमेंट्स येत आहे. या पोस्टवर अभिनेता स्वप्नील जोशी यानेदेखील कमेंट केली आहे. त्याने म्हटले की दिग्या बोलला… म्हणजे बोलला!. तसेच चाहते देखील दुनियादारीचा डायलॉग्सवर यमक जुळवत कोरोनाचा मेसेज बनवताना दिसत आहेत.


आज मुंबईत नाही तर राज्यात बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३९२५ रुग्णांची नोंद झाली, तर त्याहून अधिक म्हणजे ६३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; परंतु एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र अद्यापही नागरिक मास्क न घालता वावरताना दिसत आहे म्हणूनच आता सेलिब्रिटी सुद्धा मास्क वापरण्यासाठी जनजागृती करत आहेत.