पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; पुण्यातील तीन पैलवान जागीच ठार

16

राज्यात रविवारी तीन ठिकाणी भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. कराड, माळशेज घाट आणि पाटण तालुका या तीन ठिकाणी घटना घडली आहे.
पुण्याहून कोल्हापूरला कुस्ती परिषदेसाठी गेलेल्या पैलवानांच्या गाडीला परत जाताना कराडजवळ भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराड येथील पाचवड फाट्याजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट गाडीची धडक झाली.

या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत तर तिघे जखमी आहेत. मृत्यू पावलेले आणि जखमी झालेले पैलवान हे पुण्यातील कात्रजच्या गोकुळ वस्ताद तालमीचे आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर कराडजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचं कळत आहे. जखमींवर सध्या कराडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहे.

स्वप्निल चंद्रकांत शिंदे (वय 28), राहुल प्रल्हाद दोरगे (वय 28) व रविराज रामचंद्र साळुंखे (वय 29, सर्व रा. कात्रज, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर गणेश काळे (वय 28), बाळासाहेब गदळे (वय 31), तुषार गावडे (वय 23, सर्व रा. कात्रज, पुणे), आदित्य ओमासेे (वय 16), चंद्रकांत तावरे (वय 76), पूजा ओमासे (वय 40), भरत ओमासे (वय 45), शेजल ओमासे (वय 18, सर्व रा. कलास, ता. इंदापूर, जि. पुणे) व अन्य एकजण अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

या भीषण अपघातात दोन्ही मोटारीतील मिळून चार जण ठार झाले आहेत. यातील जखमींना कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करणात आले आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस तसेच कराड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.