दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाला आहे. शनिवारी अल्लू अर्जुन हैदराबादमध्ये होता. रामपाचोदावरम इथून परतत असताना त्याच्या व्हॅनिटी व्हॅनला एका गाडीने मागून धडक दिली गेली. त्याचा आगामी ‘पुष्पा’ चित्रपटाचे शूटिंगसाठी तो हैदराबादमध्ये गेला होता. अल्लू अर्जुन त्याच्या व्हॅनिटीमधून प्रवास करून परतला होता. त्यावेळी शनिवारी त्याच्या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाला आहे.
यावेळी व्हॅनिटीमध्ये अर्जुनची मेकअप टीम उपस्थित होती, पण सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. याप्रकरणी खम्माम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी अल्लू अर्जुन व्हॅनिटीमध्ये व्हॅनमध्ये नव्हता असे समजले आहे.
काही वर्षांपूर्वी अल्लू अर्जुनने ही व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे आणि तिला स्वतःच्या आवडीप्रमाणे बनवून घेतली आहे. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले होते. त्याने 7 कोटी रुपयांत ही व्हॅनिटी खरेदी केली होती. फाल्कन असं त्याच्या व्हॅनिटीचे नाव आहे.
लवकरच सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अल्लू अर्जुन दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना अर्जुनसोबत प्रमुख भूमिकेत असणार आहे. १३ ऑगस्ट रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.