नागपूर, मुंबई, पुण्यात इन्फेक्शनचा रेशो हा १५ टक्क्यांच्या वर आहे. मुंबईत टेस्टिंग कमी होत आहे. ते वाढवलं पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले आदी उपस्थित होते.
लॉकडाऊनबाबत सरकार काय निर्णय घेते यावर भाजपही आपला निर्णय घेईल. आम्ही जनतेसोबत आहोत, असेही फडणवीस म्हणाले. जिल्ह्यात लांबच्या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा उभाराव्यात, असही फडणवीस म्हणाले.
रुग्ण कमी झाले तर आनंदच आहे आणि कमी झालेच पाहिजे. पण अद्यापही दररोज ६५ हजार रुग्ण पाहायला मिळत आहेत. असेही फडणवीस म्हणाले.फडणवीस यांनी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत कोविड परिस्थितीविषयीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.