‘ब्रेक द चेन’ मुळे कापड व्यवसायिक संकटात

12

गेल्या वर्षीही ऐन लग्नसराईतच लॉकडाऊन लागला. यंदाही लग्नसराई सुरू होताच ‘ब्रेक द चेन’मधून व्यवसायावर अचानक निर्बंध आले आहेत. यात कापड व्यापारी आर्थिक संकटात सापडले असून, लहान व्यापारी तर मानसिकदृष्ट्या खचले आहेत. 

कापड व रेडीमेड कपड्यांच्या व्यवसायाला एप्रिल व मे महिन्यामध्ये ‘अच्छे दिन’ असतात. या दोन महिन्यात व्यवसायाचा हंगाम असतो, वर्षभरातील साठ टक्के व्यवसाय या काळात होतो. 

सरकारने ‘ब्रेक द चेन’मधून व्यवसाय बंद केले आहेत. असे असले तरी दुसरीकडे ई- कॉमर्सच्या नावाखाली ऑनलाइन खरेदी सुरू ठेवली आहे. सरकारच्या या दुजाभावामुळे व्यापारी संतप्त झाले असून, त्यांनी आठवड्यातून किमान चार दिवस तरी व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली आहे. 

बंधने घातल्याने आता लग्नसराईतील चैन संपली असून, सर्वच प्रकारचा कापड व्यवसाय घळाटला आहे.शहरात स्वतंत्र कापड लाईन असून, या भागात विविध प्रकारची कापड व रेडिमेड कपड्यांचे दुकाने आहेत.