एल्गार परिषदेदरम्यान हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा शर्जील ऊस्मानी प्रकरण चांगलेच गाजले होते. भाजपने आक्रमक पवित्रा घेत शर्जील उस्मानीवर कारवाईची मागणी केली होती. शर्जील ऊस्मानी हा पुण्यात येऊन चुपचाप जवाब नोंदवून परतला आहे. आता यावरुन पुन्हा भाजप राज्य सरकारवर टीकेची झोड ऊडवते. भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी शर्जील ऊस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई असल्याचा ऊल्लेख करत सरकारला टोला लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत सरकारला लक्ष केले आहे. “एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तवे बरळणारा शर्जील ऊस्मानी याने पुण्यात येऊन चुपचाप आपला जवाब नोंदवला आहे. यावेळी एवढी गोपनीयता बाळगण्यात आली की या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही यावरुन हे सिद्ध होते की शर्जील ऊस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे. एवढेच नव्हे तर हे सरकार म्हणजे दाढ्या कुरवाळणारे सरकार आहे”. अशी घणाघाती टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्जील ऊस्मानी याने हा गुन्हा तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. परिणामी हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचीका त्याने ऊच्च न्यायालयात दाखल केली आहे.
एल्गार परिषदेतील माझ्या भाषणाचा काहीही संदर्भ न जोडता याप्रसंगी वापर करण्यात आला आहे. मी सध्याची समाजरचना, त्यातील समस्या यांवर भाष्य केले आहे. समाजातील समस्या लोकांच्या लक्षात याव्यात त्यामुळे मी काही शब्दप्रयोग वापरले आहेत. असेही शर्जील ऊस्मानीने याचिकेत म्हटले आहे.