ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’ : देवेंद्र फडणवीस

1

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवर कडाडून टीका केली आहे. असा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही,असं म्हणत फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

“सुप्रीम कोर्टाने पत्रकार अर्णव गोस्वामी आणि हायकोर्टाने अभिनेत्री कंगना रनौत यांच्याबाबत दिलेले निकाल हे या सरकारच्या वर्षपूर्तीचे कारनामे आहेत. हे सगळं पाहता ठाकरे सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’ अशी टोकाची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पोलखोल करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना, राष्ट्रवाद आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षावर टीका केली. या सरकारने अप्रत्यक्षरित्या आणीबाणी लादली आहे. लोकशाहीची हत्या या सरकारने केली आहे. असा हल्लाच फडणवीसांनी केला.