कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. अद्यापही कोरोना संकट टळलं नसल्यानं राज्य सरकारनं रेड झोनमधील लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबातचे परिपत्रक जारी केले आहे.
लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारने यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.
सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या आदेशात लोकलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अजून काही काळ मुंबईकरांना लोकलविनाच प्रवास करावा लागणार आहे.
केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले.