छ.शिवाजी पार्कवर ठाकरे काका-पुतने येऊ शकतात आमने-सामने, “या” मुद्द्यावरुन मनसे आणि सेना वाद होण्याची शक्यता

15

मुंबईतील छ.शिवाजी पार्क हे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाचे आणि जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. बाळासाहेबांनी छ.शिवाजी पार्कवरुनच आपली भाषणे गाजवत सेनेला मजबुत केलं आहे. राज ठाकरेंनीसुद्धा शिवाजी पार्कच्या मैदानावरुन विरोधकांना चॅलेंज केलं आहे. दोन्ही पक्षांना ही जागा अत्यंत प्रिय आहे. आणि त्यातूनच आता नवा मनसे आणि शिवसेनेत नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छ. शिवाजी पार्कच्या नुतनीकरणासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेला त्यासंबंद्धीचे पत्र लिहीले आहे. यामध्ये पक्षाच्या सीएसअार फंडातून छ.शिवाजी पार्कच्या नुतनीकरणासाठी खर्च करणार असल्याचे मनसेने म्हटले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या कमकुवत आहे. आम्ही याअगोदर त्याठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग सीएसआर निधीतून केला होता. परंतू २०१७ मध्ये तो बंद पडला. त्यामुळे आम्हाला महापालिकेने याकरिता परवानगी द्यावी व त्यासंबंद्धिची निविदा प्रक्रिया थांबवावी असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

परंतू असं कुठलच पत्र मिळालं नसल्याच मुंबई महापालिकेचे मुख्याधिकारी ईक्बाल चहल यांनी सांगीतले. स्थानिक वॉर्ड अॉफीसरनं यासंबंद्धितील निविदा प्रक्रियेस सुरुवातसुद्धा केली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी छ.शिवाजी पार्कच्या नुतनीकरणात स्वत: लक्ष घातले आहे. अनेकदा त्यांनी प्रत्यक्ष नुतकरनासंबंद्धिची पाहणी करण्यासाठी तेथे भेटीसुद्धा दिल्या अाहे.

राज ठाकरेसुद्धा काही दिवसांअगोदर पालिका अधिकर्‍यांसोबत छ.शिवाजी पार्क याठिकाणी जाऊन आले. परिसराची पाहणी केल्यानंतर यासंद्धि त्यांनी काही सुचनासुद्धा केल्या आहेत. आता मनसे आणि शिवसेना दोघेही नुतनीकरणासाठी आग्रही आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत या मुद्द्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.