वाशिम जिल्ह्यातील मानोरा परिसरातील पुस नदिवरील पुलाच्या निर्मितीस शासनाने हिरवा झेंडा दाखवला आहे. कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेंद्र पाटणी यांनी या पुलनिर्मितीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासानाने त्यास मान्यातदेखील दिली होती. मात्र कोरोनामुळे त्याचे काम स्थगित झाले होते. परिस्थिती पूर्वपदावर येत असतांनाचे लक्षात येताच पाटणींनी पुन्हा पुलनिर्मितीसाठी हालचाल करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ३ कोटी ३४ लाख ६१ हजार रुपयाचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पार पडताच या पुलाच्या निर्मितीकार्यास सुरुवात होणार आहे.
मानोरा तालुक्यात गोस्ता गावाजवळून वाहणार्या पुस नदिवरील पुलाची ऊंची फारच कमी आहे. पावसाळ्यात जोराचा पाऊल झाल्यानंतर या पुलावरुन पाणी वाहू लागते. यामुळे गावांचा संपर्क खंडीत होतो. परिणामी येथील लोकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात सर्वात जास्त दाणादाण ऊडते ती रुग्णांची असे गावकर्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे याठिकाणी उंच पुल होण्याची मागणी गावकर्यांकडून होत होती. आ. पाटणी यांनी या मागणिस प्रतिसाद देत शासनदरबारी ही समस्या मांडली आणि निधी मंजूर करुन घेतला. पुल निर्मितीस सुरुवात होणार हे ऐकुन गावकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मानोरा तालुक्यात येत असलेला हातना-हातोली-रुईगोस्ता-मेंद्रा रस्त्त्यांचीसुद्धा दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे कामसुद्धा लवकरांत लवकर सुरु होईल असे आश्वासनसुद्धा आ. पाटणी यांनी यावेळी गावकर्यांना दिले.8