रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बीच सुशोभिकरणाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. श्रीवर्धनच्या विकासा -साठी राज्य सरकारकडून 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
श्रीवर्धनला प्रीवेडींग शूट करण्यासाठी येणाऱ्या जोडप्यांची प्रकरणं पोलीस ठाण्यात येतात मात्र, त्यांना चांगली वागणूक द्या, जेणेकरुन त्यांनी हनिमूनलाही इथेच आलं पाहिजे, असे खुमासदार वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार यांच्या हस्ते श्रीवर्धन बीच सुशोभिकरण प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीवर्धन लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे,आमदार अदिती तटकरे, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.