म्हणूनच त्यांनी सगळ्याच आरक्षणांचा बट्ट्याबोळ करून ठेवला आहे : आमदार पडळकर यांचा सरकारवर आरोप

19

राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून आरक्षणाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे. अहवालाचे सर्वोच्च न्यायालयात इंग्रजीमध्ये भाषांतर करणे गरजेचे होते, ते सुद्धा या सरकारने केले नाही,असे भाजपाचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

तसेच महाराष्ट्रातील काही प्रस्थापित घराण्यांनाच या महाविकास आघाडी सरकारला जपायचे आहे, म्हणूनच त्यांनी सगळ्याच आरक्षणांचा बट्ट्याबोळ करून ठेवला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकार आम्हाला वेळोवेळी योग्य माहिती देत नाही. म्हणजेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे सरकार गंभीर नव्हते, असा आरोपही त्‍यांनी केला.

दुसरीकडे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या विषयाबाबत सुद्धा सरकार बाोलत नाही. त्यामुळे आम्ही आता हे सरकार उलथून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिला.