‘त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने घेतला समाचार

93

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते आहे. धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा नामक महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी पक्ष टीकेला कारण ठरत आहे.

यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ‘मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत.’ असा जहरी टोला निलेश राणे यांनी लगावला होता.

आता निलेश राणे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय’ अशी बोचरी टीका अजित पवार यांनी पुण्यात एका खाजगी वृत्तवाहिनी