बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अलिबागच्या मेन्शन हॉटेलमध्ये 24 जानेवारीला यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या भल्या मोठ्या मॅन्शनमध्ये हा सोहळा होणार आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल आज आपल्या कुटूंबियांसह अलिबागला रवाना होतील. अलिबागमधील बरेच व्हिला अतिथींसाठी बुक करण्यात आले आहेत. आजपासून 24 जानेवारीपर्यंत लग्नाच्या विधी सुरू असतील.
तसेच नताशाच्या ‘लेहेंग्या’चा फोटो समोर आले आहेत. या इव्हेंट टीमचे सदस्य काल संध्याकाळी वेडिंग आऊटफिट्ससह नताशाच्या घरी पोहोचले होते. नताशाच्या लेहेंग्याच्या पॅकिंगमध्ये असे दिसते आहे की, नताशाने तिच्या लग्नासाठी पेस्टल शेड निवडली आहे. फोटोमध्ये आपल्याला दिसेल की या लेहेंग्यावर बीड्स आणि डायमंडचे वर्क केले आहे. या आऊटफिटमध्ये नताशा खूपच सुंदर दिसणार आहे. चाहत्यांना या ‘लव्ह बर्डसना’ एकत्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, वरुण आणि नताशा यांच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडचे दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या संगीत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे या आमंत्रितांच्या यादीत आहेत. अवघ्या दोन दिवसावर आलेल्या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून वेन्यूचे काही खास फोटोज समोर आले आहेत.