मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे शुक्रवारी सहार रोड ते राष्ट्रीय विमानतळ स्थानक हा १.५ किलोमीटर लांबीचा ३६ वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. तापी-1 आणि तापी-2 या दोन टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) च्या मदतीने पॅकेज-6 ने एकूण 4.4 किमीचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. तर दुसरीकडे मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५०.३ कि.मी. म्हणजे ९३ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले.
या पॅकेजमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सहार रोड अपलाईन – 687 मी. आणि डाउनलाईन – 692 मी., सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ अपलाईन – 1515 मीटर आणि डाउनलाईन – 1512 मीटर) या चार भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. पॅकेज-6 ने एकूण 4.4 किमीचे भुयारीकरण पूर्ण केले. यावेळी कोची मेट्रो रेलचे व्यवस्थापकीय संचालक अल्केश शर्मा यांची उपस्थिती होती.
या दोन्ही स्थानकांना एअरपोर्ट टर्मिनलशी जोडले जाईल. त्यामुळे विमानतळापर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे; तर संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले की, हार्ड रॉक तंत्रज्ञानाने सुसज्ज टेराटॅकनिर्मित टीबीएम तापी – १ आणि २ द्वारे १५ महिन्यांत भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. राष्ट्रीय विमानतळ स्थानकाचे जवळपास ७६.४ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.