बलात्कार करुन पळून जाणार्‍या आरोपींस घरातील पाळीव कुत्र्याने दिले पकडून

23

प्रामाणिमपणासाठी आपल्याकडे कुत्र्याचे ऊदाहरण आपण नेहमि ऐकत असतो. तसेच एखाद्या कुटुंबातील पाळीव कुत्रा आणि कुटुंबाचे कुटुंबातील सदस्य असल्यासारखे त्याच्यासोबत वागणे हेसुद्धा आपन आजुबाजुला बघत असतो. अशीच कुटुंबाचा सदस्य असल्याची भूमिका एका पाळीव कुत्र्याने प्रामाणिकपणे निभावली आहे.

घरातील मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असणार्‍या आरोपीस त्याच घरातील पाळीव कुत्र्याने पकडले. त्याचा रस्ता अडवला आणि त्यानंतर ऊडालेल्या गोंधळामुळे संबंद्धिय अरोपी पकडल्या गेला.

तामिळनाडूतील कोईम्बतुर येथील ही घटना आहे. एस. दिलीपकुमार असे आरोपीचे नाव असून तो सोनारकाम करतो. आरोपीचे वय २९ वर्षे आहे. त्याच्याच परिसरात एक मनोरुग्ण महिला तीच्या घरासमोरील शेडमध्ये राहते. शेडच्यामागे कुटुंबीय राहतात.

या गोष्टीचाच फायदा घेऊन आरोपी शेडमध्ये शीरला आणि मनोरुग्ण महिलेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. परंतू त्यावेळी घरातील पाळीव कुत्रा त्याठिकाणी पोहचला. कुत्रा दिसताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याने त्याची पॅंट पकडली आणि रस्ता अडवला.

कुत्रा भुकंत असल्याने कुटुंबीय बाहेर आले तेव्हा शेडमधील लाईट बंद दिसला. शेडमध्ये त्यांना संबंद्धित आरोपी दिसताच कुटिबियांनी त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक माहिती याप्रकरणी समोर आली आहे. आरोपीने याअगोदर दोनवेळा महिलेवर बलात्कार केला होता. महिलेचे अश्लील फोटोसुद्धा त्याने काढलेले होते.