‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट बहुतांश लोकांचा आवडीचा आहे. या सिनेमात एका लहान मुलाची व्यक्तिरेखा सगळ्यांना कमालीची आवडली. परजान दस्तूर हे त्याचं नाव. या कलाकाराचे आता दोनाचे चार हात झाले आहेत. परजान २९ वर्षांचा आहे. नुकतेच त्याने आपली गर्लफ्रेंड डेल्ना श्रॉफसोबत लग्न केलं आहे. दोघं एकमेकांना दीर्घकाळापासून डेट करतात. दोघांनी पारंपरिक पारशी पद्धतीने विवाहसोहळा केला आहे.
लग्नाच्या फोटोमध्ये परजान ट्रेडिशन व्हाइट ड्रेसमध्ये दिसत आहे. तर डेलनाने मरुन कलरची साडी परिधान केली आहे. परजानने हा फोटो स्वतःला आणि डेलनाला टॅग करुन, ‘स्टार इज शायनिंग’, असे कॅप्शन त्याला दिले आहे. ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात त्याचा डायलॉग ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ हा लोकांना खूप आवडला होता.
सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. त्याने सोशल मीडिया स्टोरीवर एक फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याने डेल्नासोबत एक समुद्राच्या बीचवर असतानाचा फोटो शेअर केला होता. यात तो गुडघ्यांंवर बसून डेल्नाला प्रपोज केला होता.