कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे देशात पाच राज्यात एकाचवेळी विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात मोठी गर्दी होत आहे. निवडणुकांना घाबरून सदरील राज्यातील कोरोना पळून गेला काय ? असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह ५ राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानिमित्ताने प्रचारसभेला वेग आला आहे. सदरील पाच राज्यात चाचण्या कमी होत असल्याने त्या ठिकाणी कमी रुग्ण आढळले जात असल्याचं काही तज्ञांच मत आहे. महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रुग्ण मिळण्याचे प्रमाणही वाढत असल्याचं समजतय.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या १० शहरांपैकी ९ शहरे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील काही जिल्हे लॉक डाऊन करण्यात आली आहेत. नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर अन्य जिल्हे सुद्धा लॉक डाऊन होतील अशी भीती आता सामान्य नागरिकांमध्ये आहे. लॉकडाऊन नकोच अशी भूमिका सामान्य नागरिकांची घेतल्याने, प्रशासनाची तारांबळ उडणार आहे.