अंबानी कुटूंबात नव्या पाहुण्याच आगमन

16

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांनी गोड बातमी दिली असून त्यांना मुलगा झाला आहे.अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत.

आकाश आणि श्लोका दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत आहेत. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच दोघांनीही आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. आकाश अंबानी आणि श्लोका २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आकाश आणि श्लोका यांच लग्न अत्यंत थाटामाटात पार पडलं होतं. जगभरात या लग्नाची चर्चा होती.लग्नाला सिनेसृष्टीपासून, क्रिडा जगतामधील बड्या नावांबरोबरच उद्योग श्रेत्रातील दिग्गजांचाही समावेश होता.

नीता आणि मुकेश अंबानी यांना पहिल्यांदाच आजी आजोबा झाल्याने प्रचंड आनंद झाला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी आणि मेहता कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे,” नवजात बाळ आणि श्लोका अंबानी दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.अशी माहिती अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्याने दिली आहे..