लॉकडाऊनची चर्चा सुरु होण्यापूर्वी महिन्याला किमान 14 लाखांचे उत्पन्न असलेल्या बारामती आगाराचे उत्पन्न आता दहा लाखांपर्यंत खाली आले आहे. पूर्वी दिवसाला 300 फे-या व्हायच्या आता ही संख्या 180 वर आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व घटलेली प्रवासी संख्या या मुळे एसटीच्या बारामती आगाराला दररोजचा किमान चार लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.लॉकडाऊन होणार या भीतीनेच प्रवाशांनी प्रवासाचे बेत रद्द केल्याचा परिणाम एसटीवरही जाणवला.
पूर्वी उन्हाळ्यात एसटीत उभे राहायला जागा नसायची इतकी गर्दी होत असायची, आता 44 आसनक्षमतेच्या बसमध्ये निम्मे प्रवासी आले तरी कर्मचारी आनंदीत होतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वरिष्ठ आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, धुळे, कोल्हापूर, बीड, हैदराबाद, जालना, पैठण, श्रीरामपूर या सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या सुरु आहेत.